पाषाण बाणेर लिंक रस्त्यावरील पादचारी मार्गावर पार्किंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईची मागणी

पाषाण : पाषाण बाणेर लिंक रस्त्यावरील पादचारी मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहने लागत असल्यामुळे नागरिकांना रस्त्याच्या माध्यमातून जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. संत तुकाराम प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना रस्त्याच्या मधून धोकादायक पद्धतीने चालावे लागत असून यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बाणेर पाषाण लिंक रस्त्यावरील पादचारी मार्गावर दुचाकी चार चाकी वाहने पार्किंग केली जातात. यामुळे वाहतूक कोंडीमध्ये भर पडत आहे. ज्या अवैद्य पार्किंग केलेल्या वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. यामुळे नागरिक त्रस्त झाले असून शालेय विद्यार्थ्यांना नाईलाजाने रहदारीच्या रस्त्यावरून चालावे लागते. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो व विद्यार्थ्यांना देखील त्रास सहन करावा लागतो.

पाषाण बाणेर लिंक रस्त्यावर संत तुकाराम प्राथमिक शाळेपासून पाषाणकडे जाणारा पादचारी मार्ग दुरुस्त करण्यात यावा तसेच पादचारी मार्गावर गाड्या लावणाऱ्या वाहन चालकांवर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.

See also  टेनिक्वाईट (रिंग टेनिस) जागतिक स्पर्धा प्रशिक्षण शिबीरामध्ये पुण्याचे प्रथमेश ढवळे, साहिल खेडेकर, प्रणव पाटील आणि सिध्दि जाधव यांची निवड