सुतारवाडी प्रेम नगर परिसरात 25 लक्ष रुपयांच्या ड्रेनेज लाईनच्या कामाचे उद्घाटन

पाषाण : सुतारवाडी येथील प्रेमनगर येथे कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या स्थानिक निधीतून 25 लक्ष रुपयांच्या ड्रेनेज लाईनच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी माजी नगरसेविका स्वप्नाली सायकर, भाजपा चिटणीस राहुल कोकाटे, कोथरूड मतदार संघ अध्यक्ष सचिन पाषाणकर, माजी स्वीकृत सदस्य बालम सुतार, माजी स्वीकृत सदस्य शिवम सुतार, सचिन दळवी, रोहन कोकाटे, पांडुरंग रणपिसे, अमर रणपिसे, अविनाश रणपिसे, दिलीप सुतार आदी उपस्थित होते.

गेले अनेक महिने या परिसरामध्ये ड्रेनेज लाईन मधील पाणी रस्त्यावर वाहत होते. याबाबत नागरिकांनी माजी पालकमंत्री आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्यानंतर याची दखल घेत आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्थानिक निधीतून 25 लाख रुपये या कामासाठी दिले. प्रेमनगर परिसरातील नागरिक तसेच सुतारवाडी परिसरातील ग्रामस्थ व शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा त्रास यामुळे कमी होणार आहे.

See also  मोहिते पाटलांच्या " बलराज " अश्वाचे देहूकडे प्रस्थान
आज जगतगुरुंच्या पालखीचे श्री क्षेत्र पंढरीकडे प्रस्थान