बाणेर : बाणेर येथील वाडकर (बिटवाईज) चौक येथे गेली अनेक महिन्यांपासून ओव्हरफ्लो होऊन ओसंडुन वाहत असलेले सांडपाणी तातडीने बंद करण्याकरीता नविन ड्रेनेज लाईन टाकण्याची मागणी माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी पुणे मनपा कडे केली होती. सततच्या पाठपुराव्यातुन पुणे मनपा ने या ठिकाणी नविन ड्रेनेज लाईन टाकण्याकरीता निविदा प्रक्रिया पूर्ण करून ६०० मिमि व्यासाची ११० मीटर लांब लाईन टाकण्याकरीता २५ लक्ष रुपयांची तरतुद उपलब्ध करुन दिली आहे. सदर ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) चे अधिकारी श्री.कुलकर्णी यांच्यासह अमोल बालवडकर यांनी प्रत्यक्ष जागेवर पाहणी केली.
यावेळी NHAI चे वरिष्ठ अधिकारी श्री.कदम साहेब यांना संपर्क करुन सर्विस रस्यावर ड्रेनेज वाईन टाकण्याकरीता पुणे मनपाला NHAI ची तातडीने NOC देण्यात यावी अशी विनंती केली असता त्यांनी देखिल सकारात्मक प्रतिसाद देत येत्या २ दिवसात लेखी मान्यता (NOC) देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले.
लवकरच याठिकाणी या नविन ड्रेनेज लाईनच्या कामास सुरुवात होईल व निश्चितच या सांडपाण्यामुळे नागरीकांना व त्यांच्या आरोग्याला होणारी हानी पासुन तसेच त्रासापासुन मुक्तता मिळेल.
यावेळी माजी नगरसेवक अमोल बालवडकर, मलनिसारण विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.अलभर, NHAI चे श्री.कुलकर्णी, कनिष्ठ अभियंता श्री.अनिकेत शिंदे उपस्थित होते.