भारतीय बाजारात सोन्याला झळाळी. प्रति १० ग्राम ६० हजाराच्या पार.

मुंबई: प्रति १० ग्राम ६० हजार हि सोन्याची आजवरची सर्वात उच्चानकी नोंद आहे.
सोने आणि चांदी यांच्या किमती रुपया आणि अमेरिकन डॉलरच्या मूल्यांकनावर तसेच जागतिक बाजारातील मागणीवर विशेषतः आवलंबून असल्या तरी भारतासारख्या देशात इतरहि अनेक गोष्टीं ह्या सोन्या चांदीच्या किमतींना प्रभावित करत असतात.
मोतीलाल ओसवाल फिनान्सियल सर्विसेस चे नवनीत दमाणी यांनी दिलेल्या माहिती नुसार सोन्यात आजून वाढ होणे अपेक्षित आहे. जागतिक बँकिंग व्यवस्थेतील मागील काही आढवड्यातील अनिश्चितता हे मुख्य कारण यामागचे असल्याचे दिसते. सोने हे सुरक्षित गुंतवणूक म्हणून जगभर ओळखले जाते.

See also  उमेदवार आणि राजकीय पक्षांनी निवडणूक नियमावलीचे पालन करावे – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम