भाजपा उत्तर मंडळच्या उपाध्यक्षपदी प्रकाश मुकुंदराव तापकीर यांची नियुक्तीने तापकिरांची देखील प्रभाग 9 मध्ये इच्छुकांमध्ये एन्ट्री

पुणे : कोथरूड विधानसभा मतदारसंघ भाजपा उत्तर मंडळच्या उपाध्यक्षपदी प्रकाश मुकुंदराव तापकीर यांची नियुक्ती करण्यात आली. यामुळे प्रभाग क्रमांक 9 सुस बाणेर बालेवाडी मधील इच्छुकांच्या मध्ये तापकिरांची देखील एंट्री झाल्याचे समजले जात असून बाणेर मध्ये प्रथमच मराठा समाजाचा पदाधिकारी देण्यात आला आहे.

भाजपा पुणे शहर मध्यवर्ती कार्यालय येथे केंद्रीय मंत्री खासदार मुरली अण्णा मोहोळ,  कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील शहराध्यक्ष धीरज घाटे, खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्या उपस्थितीत बाणेर भागातील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश मुकुंदराव तापकीर तसेच महाळुंगे गावातील सामाजिक कार्यकर्ते विनायक शिवाजी चिव्हे व प्रियांका विनायक चिव्हे व त्यांच्या समवेत इतर कार्यकर्ते यांचा पक्षप्रवेश झाला. यामध्ये प्रकाश मुकुंदराव तापकीर यांना कोथरूड विधानसभा मतदारसंघ उत्तर मंडळ उपाध्यक्ष पद देण्यात आले तसेच विनायक शिवाजी चिव्हे यांना कोथरूड विधानसभा मतदारसंघ उत्तर मंडळ सचिव पद देण्यात आले.

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाची मजबूत स्थिती असलेला बाणेर बालेवाडी पाषाण परिसरामध्ये इच्छुकांची सर्वाधिक संख्या आहे. बाणेर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राहिलेले प्रकाश तापकीर साम्राज्य ग्रुप दहीहंडी च्या माध्यमातून युवकांच्या मध्ये कार्यरत आहेत. खासदार मेधा कुलकर्णी यांच्या 2014 मधील विधानसभा निवडणुकांपासून तापकीर भाजपामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी आमदार चंद्रकांत दादा पाटील व खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या निवडणुकांमध्ये बाणेर मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. कोथरूड  विधानसभा  मतदार संघावर तापकीर यांची पक्ष कार्यकारणी नियुक्ती झाल्याने बाणेर मधून यंदा तापकीर घराण्यातील उमेदवार रिंगणात येणार असल्याची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे. तर विनायक चिव्हे महाळुंगे गावांमधील प्रसिद्ध व्यावसायिक आहेत. एसटी प्रवर्गामध्ये त्यांची दावेदारी प्रबळ ठरू शकते.

See also  खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद, राज्यमंत्री माधुरी मिसाळही अभियानात सहभागी