अंबाईमाता देवस्थानच्या वतीने  कष्टकरी, आदिवासी महिलांना साड्यांची भाऊबीज भेट

पुणे: धायरी येथे  शिवकालीन श्री अंबाईमाता देवस्थान वतीने दिवाळी निमित्त धायरी, खडकवासला भागातील  अडिचशे कष्टकरी सफाई ,घरेलु कामगार महिलांना तसेच सिंहगड निगडे मोसे भागातील आदिवासी कातकरी तसेच गरजु महिलांना साडीचोळीची भाऊबीज भेट देऊन सन्मानित करण्यात आले.

धायरी येथे देवस्थानचे अध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग चव्हाण पाटील व नांदेडसिटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  अतुल भोस  यांच्या हस्ते साडी चोळींची भाऊबीज भेट देण्यात आली.तर सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याला निगडे मोसे येथिल ऐतिहासिक शिवशंभू शिल्प सृष्टीत चव्हाण पाटील, किसान काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव दांगट व काळभैरवनाथ पतसंस्थेचे संस्थापक रघुनाथ यादव यांच्या हस्ते साडीचोळींची भेट देण्यात आली.

यावेळी बोलताना श्रीरंग चव्हाण पाटील म्हणाले,देवस्थानच्या वतीने गेल्या वीस वर्षांपासून भाऊबीजेच्या दिवशी कष्टकरी,गरजु महिलांना साडीचोळीची भाऊबीज भेट देण्यात येत आहे.

यावेळी काकासाहेब चव्हाण, जयश्री पोकळे,गुलाबराव पोकळे, संदीप पोकळे, धनंजय बेनकर,देवस्थानचे पदाधिकारी चंद्रकांत वांजळे ,भाऊसाहेब कामठे ,सोपान लायगुडे ,हिरामण पोकळे, बाळासाहेब कामठे, सोमनाथ भोसले ,सागर पोकळे, किरण पोकळे ,बाजीराव चौधरी,  संदिप चव्हाण, नामदेव भुरुक, निलेश दमिष्टे, सनी रायकर आदी उपस्थित होते

See also  शाळा आणि अंगणवाड्यांची कामे त्वरित पूर्ण करा -पालकमंत्री चंद्रकांत पाटील