सुतारवाडी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातील पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक संपन्न

पाषाण  : आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाषाण सुतारवाडी सोमेश्वर वाडी या भागातील सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातील पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पाडली. या बैठकीत आगामी निवडणुकीच्या काळात कोणते मुद्दे घेऊन आपण जनतेच्या समोर जाणार आहोत. या सर्व विषयावर चर्चा करण्यात आली. आणि सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा जोमाने काम करू अशी आश्वासन दिले.

पक्षप्रमुखांचा आदेश हाच अंतिम मानून आगामी काळात निवडणुकीला सामोरे जाऊ. या बैठकीला संतोष तोंडे (विभाग प्रमुख), संजय निम्हण (विभाग समन्वयक), अजय  निम्हण (शिवसेना नेते), स्वातीताई रणपिसे (विभाग संघटिका), अशोक दळवी (सेना नेते), महेश सुतार (शिवदूत), रामदास निम्हण (शिवसेना नेते),  ऋषिकेश कुलकर्णी (प्रभाग प्रमुख),  निखिल निम्हण (प्रभाग प्रमुख), दिनेश नाथ (उपविभाग प्रमुख), संदीप सातव (उपविभाग प्रमुख) ,अमित रणपिसे (युवा सेना अधिकारी), गणेश दळवी (शिवसैनिक), शिवाजी टवाळ,  करण कांबळे (प्रचार प्रमुख), दशरथ खेडेकर, अजिंक्य सुतार (शाखाप्रमुख), अमोल फाले (शाखाप्रमुख) , सुनील राजगुरू (शाखाप्रमुख), सुनिता रानवडे (शाखा संघटिका), मोहन कांबळे आजी-माजी पदाधिकारी सर्व उपस्थित होते.

See also  पिरंगुट अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज देऊनही पोलिसांकडून कारवाई होईना