बाणेर : मेन खासापुरी व खासापुरी -2 व चव्हाणवाडी अशा तीन गावातील पूरग्रस्त महिलांना बालेवाडी येथे ह भ प संजय बापू बालवडकर यांच्या वतीने भाऊबीज निमित्त साड्या भेट देण्यात आल्या. मराठवाडा व परिसर मित्र मंडळाचे अध्यक्ष सुभाष भोळ यांनी पूरग्रस्त नागरिकांच्या भेटी घेऊन मदत सुपूर्द केली.
हभप संजय (बापू) बालवडकर यांनी 150 साड्या व आर एस एस भूषण चौधरी यांनी 180 सोन पापडी पाॅकेट दिले. पूरग्रस्त भागामध्ये अद्याप पर्यंत काही भागात पुरेशी मदत पोहोचलेली नाही. घरे वाहून गेलेले नागरिक पत्र्याच्या शेडमध्ये आसरा घेऊन राहत आहेत. या नागरिकांना मदत पोहोचवण्याचे काम पुणे शहरातील नागरिकांच्या मदतीने केले जात आहे.
दिवाळीमध्ये नागरिकांना आनंद साजरा करता यावा यासाठी तीन गावातील महिलांना साडी वाटप व मिठाई देण्यात आली.

























