सत्तेच्या उघड्या नागड्या वास्तवाने आज केला मतदारांचा अपमान!: मुकुंद किर्दत, आम आदमी पार्टी

पुणे : ‘गेल्या 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील मतदारांनी जे प्रस्थापित पक्षांचे नागडे रूप पाहिले आहे, त्याचे टोक आज गाठले गेले आहे.’ राष्ट्रवादी फुटीर गटा सोबत आज अजित पवार यांनी उप मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्याबाबत आम आदमी पार्टीच्या मुकुंद किर्दत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मादीला थोड्यात 70 हजार कोटीचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रवादी वर केला होता आणि आता त्याच राष्ट्रवादीसोबत भाजप, शिंदे गटाने युती केली आहे.

‘भाजपने नैतिकता आणि पार्टी विथ डिफरन्स नावाने जे नेसू नेसले होते ते आज सुटले आहे. फसवणूक विश्वासघात उन्माद बदमाशी अहंकार ब्लॅकमेल याला प्रतिष्ठा देणाऱ्या राजकारणाने आज पुढचा टप्पा गाठला आहे. मूल्यांच्या अभावाचे सत्ताकारण काय रूप घेते हे या सर्व आमदारांनी मतदारालाला दाखवून दिले आहे. या संधी साधूपणाच्या राजकारणाला आता एकमेव पर्याय हा आम आदमी पार्टी राहिलेला आहे.’असे आप चे मुकुंद किर्दत यांनी म्हंटले आहे.

See also  मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा शानदार शुभारंभ; बहिणींच्या आनंदसोहळ्यात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री सहभागी