पुणे महानगरपालिकेच्या पथ विभागामार्फत खड्डे मुक्त अभियानाची सुरुवात

पुणे : पुणे महापालिकेच्या पथ  विभागामार्फत खड्डे मुक्त अभियानाची  सुरुवात  सारसबाग येथील सणस ग्राउंड च्या समोरील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या गेटच्या समोरील अत्यंत खराब झालेल्या खड्डे युक्त रस्त्याचे रीतसर मिलिंग करून करण्यात आली.

महापालिकेमार्फत जारी असलेल्या एसओपी नुसार सदर भागाचे डांबरमालात पॅचवर्क करून अभियानाचे उद्घाटन मा. महापालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम तसेच मा.अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि.) श्री. ओमप्रकाश दिवटे यांच्या शुभहस्ते आणि पथ विभागाच्या अभियंतांच्या उपस्थितीत करण्यात आले.

पुणे पोलिसांच्या करिता राबविण्यात येत असलेल्या सीसीटीव्ही प्रकल्प अंतर्गत शहराच्या अनेक भागात प्रामुख्याने शहराच्या मध्यवर्ती पेठ भागात मोठ्या प्रमाणावर रस्त्याची आणि पदपथां मध्ये  खोदाई करण्यात आलेली असल्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते व फुटपाथ अत्यंत खराब स्थितीत आहेत.यामुळे नागरिकांमध्ये खराब नादुरुस्त रस्त्यांमुळे आणि फुटपाथ मुळे प्रचंड असंतोष पसरलेला आहे. या सर्व बाबींचा एकत्रित विचार करून पुढील काळामध्ये शहरातील रस्ते खड्डे मुक्त करण्याचा संकल्प पुणे महानगरपालिकेमार्फत करण्यात आलेला असून त्याची सुरुवात आज करण्यात आली.

See also  माहिती अधिकार कट्ट्याचा दहावा वर्धापन दिन