भाजपा उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी मनसे नेते अमित ठाकरे यांची पुणे मनसे कार्यालयात घेतली भेट

पुणे : भाजपाचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांची  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे शहर कार्यालयात सदिच्छा भेट घेतली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल यावेळी मोहोळ यांनी धन्यवाद व्यक्त केले. यावेळी अमित ठाकरे यांनी मनसेची संपूर्ण पुणे शहर संघटना आपल्या प्रचारात असेल, असा विश्वास दिला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतलेल्या भूमिकेमुळे महायुतीची ताकद नक्कीच वाढली असून शहरभर असलेले मनसेचे संघटन पुणे लोकसभेत महायुतीचे मताधिक्य वाढवण्यास मोठा हातभार मिळणार आहे असे मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मनसेचे नेते श्री. बाबू वागसकर, सरचिटणीस श्री. रणजीत शिरोळे, सरचिटणीस श्री. बाळा शेडगे, सरचिटणीस श्री. अजय शिंदे, शहराध्यक्ष श्री. साईनाथ बाबर, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष श्री. राजेश पांडे, शहराध्यक्ष श्री. धीरज घाटे, श्री. हेमंत रासने आदी उपस्थित होते.

See also  राज्यातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गत गट ‘क’ संवर्गातील १९ हजार ४६० पदांची मेगाभरती; जाहिरात उद्या – मंत्री गिरीष महाजन