रा.स्व.संघ जनकल्याण समिती व विद्यापीठ भाग यांच्या वतीने वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबिर

पाषाण : रा.स्व.संघ जनकल्याण समिती व विद्यापीठ भाग यांच्या वतीने श्रीनिवासजी काळे चँरिटेबल ट्रस्ट द्वारा संचलित श्री संत ज्ञानेश्वर माऊली दिंडी सोहळा अहमदपुर जिल्हा लातुर दिंडीतील वारकऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबीर एन.सी.एल. हॉल, SBI बँकेसमोर, विद्यापीठ रोड येथे आयोजित करण्यात आले होते.


या शिबिरामध्ये ६३ महिला वारकरी – व ५३पुरुष वारकरी – एकुण – ११६ वारकरी सहभागी होऊन सेवेचा लाभ घेतला.
शिबीर मध्ये डॉ नितीनजी अबोलकर सुतारवाडी , डॉ प्रविण पाटील पाषाण, डॉ विजय पाटील सोमेश्वरवाडी, डॉ आंनद जराड बाणेर, डॉ स्वाती पाटील सुसरोड, डॉ प्रज्वल खेडकर सुसगाव यांनी वारकऱ्यांची आरोग्य तपासणी केली.

यावेळी पाषण नगर संघचालक राजाभाऊ सुतार, नगरकार्यवाह सुनिल भाले, सेवाप्रमुख महेंद्र रणपिसे, भोजकुमार शर्मा, देशपांडे, राजेंद्र बाके आदी उपस्थित होते.
शिबिराची सर्व व्यवस्था पाषाण नगरातील स्वयंसेवकांनी केली होती.

See also  आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू - आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत