पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट)चे प्रभाग क्रमांक ९ सुस बाणेर–पाषाण येथील उमेदवार जयेश मुरकुटे यांनी प्रचाराला चांगलाच वेग दिला असून परिसरातील विविध सोसायट्यांमध्ये त्यांना नागरिकांचा सकारात्मक आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
बाणेर व पाषाण परिसरातील गृहनिर्माण सोसायट्यांना भेटी देत जयेश मुरकुटे यांनी थेट नागरिकांशी संवाद साधला. यावेळी स्थानिक प्रश्न, पाणीपुरवठा, रस्ते, वाहतूक, स्वच्छता, हरित क्षेत्रांचे संवर्धन तसेच नागरी सुविधांबाबत नागरिकांच्या अडचणी त्यांनी जाणून घेतल्या. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी स्पष्ट भूमिका मांडत विकासाभिमुख आणि पारदर्शक कारभाराचे आश्वासन त्यांनी दिले.
जयेश मुरकुटे यांच्या साध्या, संवादात्मक आणि प्रश्नकेंद्रित प्रचारपद्धतीला सोसायटीधारकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून अनेक ठिकाणी नागरिकांनी पाठिंबा दर्शवला. “स्थानिक पातळीवरील प्रश्न समजून घेणारा आणि प्रत्यक्ष काम करणारा उमेदवार हवा” अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
प्रचारादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) शहर उपाध्यक्ष संदीप बालवडकर यांच्यासह कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती असून बाणेर–पाषाण प्रभागात जयेश मुरकुटे यांचा जनसंपर्क अधिक दृढ होत असल्याचे चित्र आहे. आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ऑनलाईन मीटिंग द्वारे देखील जयेश मुरकुटे सध्या सोसायटीतील नागरिकांशी संपर्क साधताना दिसत आहेत. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यामुळे देखील जयेश मुरकुटे यांना सुशिक्षित वर्गातून प्रतिसाद मिळत आहे.
























