औंध : औंध परिसरात गेल्या काही वर्षांत सर्वांगीण व दीर्घकालीन विकासाचे भक्कम जाळे उभे राहत असून, या परिवर्तनामागे माजी महापौर दत्तात्रय गायकवाड व माजी नगरसेविका संगीता गायकवाड यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व निर्णायक ठरले आहे. नागरिकांना आवश्यक असलेल्या मूलभूत ते आधुनिक सुविधा उपलब्ध करून देत औंधची वाटचाल थेट स्मार्ट सिटीच्या दिशेने सुरू झाली आहे.
औंध व परिसरातील वाहतूक कोंडी दूर करत दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारा राजीव गांधी पूल (ब्रिज) उभारण्यात आला. यामुळे नागरिकांची दळणवळणाची समस्या मोठ्या प्रमाणात सुटली आहे. सांस्कृतिक व कलाविकासाला चालना देण्यासाठी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी नाट्यगृहाची भव्य उभारणी करण्यात आली असून, औंध सांस्कृतिक केंद्र म्हणून नव्याने ओळख निर्माण करत आहे.
औंध गावठाण परिसरातील ओव्हरहेड विद्युत केबल्स भूमिगत करण्यात आल्याने सुरक्षितता वाढली असून परिसराचा सौंदर्यात्मक दर्जा उंचावला आहे. तसेच औंध आयटीआय परिसरात सुसज्ज व भव्य पादचारी मार्ग विकसित करण्यात आल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
क्रीडा व आरोग्य क्षेत्रातही भरीव कामगिरी करण्यात आली आहे. क्रीडांगण, पालिकेची सुसज्ज शाळा, स्विमिंग पूल, व्यायामशाळा, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, तसेच राम-लक्ष्मण पार्क यामुळे औंध परिसरात आरोग्यदायी जीवनशैलीला चालना मिळाली आहे. आरोग्य सेवांसाठी उभारण्यात आलेले एम्स हॉस्पिटल नागरिकांसाठी वरदान ठरत आहे. तसेच वाहतूक व नागरिकांच्या सोयीसाठी गायकवाड पेट्रोल पंपाची उभारणी करण्यात आली आहे.
विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर नागरिकांच्या गरजांना प्राधान्य देत उभारलेले हे कायमस्वरूपी व भक्कम विकास नेटवर्क औंधला आधुनिक, सुरक्षित व सुसज्ज शहर म्हणून घडवत आहे. या यशस्वी विकासामुळे औंधची ओळख आता केवळ उपनगर म्हणून न राहता, स्मार्ट सिटीचा आदर्श नमुना म्हणून होत आहे.
























