बालेवाडी–बाणेर परिसरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ज्योतीताई चांदेरे यांचा नागरिकांशी संवाद साधत प्रचार

बालेवाडीज्ञ: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या इच्छुक उमेदवार सौ. ज्योतीताई नितीन चांदेरे यांनी बालेवाडी गावठाण परिसरातील नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेत सघन प्रचार केला. स्थानिक नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि विकासाच्या गरजांवर त्यांनी सविस्तर चर्चा केली.
याच अनुषंगाने बाणेर येथील विधाते वस्ती परिसरातील विविध सोसायट्या तसेच बैठी घरे येथे घरोघरी जाऊन प्रचार करण्यात आला. नागरिकांना प्रचार पत्रके देत शिवसेनेची भूमिका, स्थानिक विकासाचा दृष्टिकोन आणि भविष्यातील नियोजन याबाबत माहिती देण्यात आली. या प्रचार दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या प्रचारात महाळुंगेचे माजी सरपंच मयूर भांडे, महेश सुतार, नितीन चांदेरे, श्याम बालवडकर यांच्यासह इतर इच्छुक उमेदवार व शिवसेना पदाधिकारी सहभागी झाले होते. सर्वांनी एकत्रितपणे परिसरात फिरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची ताकद आणि संघटन स्पष्ट केले.

सौ. ज्योतीताई चांदेरे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिक नेतृत्व आणि जनतेशी थेट संवाद आवश्यक आहे. बालेवाडी–बाणेर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे.”

या प्रचार दौऱ्यामुळे परिसरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवारीबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला अधिक गती मिळत आहे.

See also  शिवसेना शाखा सुतारवाडी व सन वाईन प्रीस्कूल च्यावतीने वृक्षरोप वाटप