पाषाण : पाषाण येथील माजी नगरसेवक प्रमोद अण्णा निम्हण यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अन्याय केल्यानंतर पाषाण ग्रामस्थांच्या वतीने जोरदार निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय अधिकृतपणे जाहीर करण्यात आला.
या निर्धार मेळाव्यास महिला भगिनी, ज्येष्ठ नागरिक, युवक व ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली होती. संपूर्ण सभागृहात अन्यायाविरोधातील रोष आणि अण्णांप्रती असलेला विश्वास स्पष्टपणे दिसून येत होता. या मेळाव्यातील सर्वात भावनिक क्षण ठरला तो अवंती घाणेकर या शालेय विद्यार्थिनीने दाखवलेल्या ग्रामस्वाभिमानाचा. अवंतीने आपल्या खाऊसाठी जमवलेला गल्ला थेट निवडणूक खर्चासाठी देऊ करत “अण्णांसाठी हे माझं छोटंसं योगदान” असे सांगितले.
गावाच्या स्वाभिमानाच्या लढाईत लहान मुलांचाही सहभाग पाहून उमेदवारांसह उपस्थित सर्वच नागरिक भावूक झाले. अवंतीने दिलेली ही मदत प्रमोद अण्णा निम्हण व पुनम विधाते या दोन्ही उमेदवारांनी स्वीकारत, तिच्या गल्ल्यामध्ये पुन्हा पैसे टाकून तिच्या सामाजिक जाणीवेचे आणि धाडसाचे कौतुक केले.
हा क्षण उपस्थितांसाठी केवळ मदतीचा नव्हे, तर गावाच्या भविष्याबद्दलच्या विश्वासाचा साक्षीदार ठरला.
पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी व सुस रोड परिसरात विकासासाठी प्रमोद अण्णा निम्हण यांनी केलेल्या भरीव कार्याची भावना लक्षात घेता, यावेळी परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक तसेच विविध क्षेत्रात कार्यरत नागरिकांनी एकत्र येत,
“अन्याय करणाऱ्या नेत्यांच्या विरोधात मतदान करून अण्णांना विजयी करण्याचा”
ठाम निर्धार व्यक्त केला.
हा मेळावा म्हणजे केवळ प्रचार सभा नव्हे, तर ग्रामस्वाभिमान, विश्वास आणि अन्यायाविरोधातील एकजूट यांचे जिवंत उदाहरण ठरला.


























