कोथरूड उत्तर मंडलच्या भाजप महिला मोर्चा सरचिटणीसांचा राष्ट्रवादीत प्रवेश; वैशाली कमाजदार यांची पुणे शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती

पुणे : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माननीय श्री. अजित दादा पवार यांच्या हस्ते सौ. वैशाली ताई कमाजदार यांना पुणे शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या कार्याध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
कोथरूड उत्तर मंडलच्या भाजप महिला मोर्चाच्या सरचिटणीस पदावर कार्यरत असलेल्या वैशाली कमाजदार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश करताच त्यांची थेट महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

या नियुक्तीबद्दल बोलताना वैशाली कमाजदार यांनी,“पक्षप्रवेश व तात्काळ नियुक्ती यासाठी माननीय अजित दादा पवार यांचे मनापासून आभार मानते. माझ्या राजकीय आणि सामाजिक कार्यातील यशाचे श्रेय श्री. अमोल बालवडकर व बाबुराव चांदेरे यांना जाते,” असे सांगितले.

त्यांच्या प्रामाणिक कर्तृत्व, नेतृत्वगुण, सामाजिक बांधिलकी, महिलांच्या प्रश्नांबाबतची संवेदनशीलता, संघटन कौशल्य आणि सातत्यपूर्ण कार्य या गुणांच्या बळावरच हा पदभार मिळाल्याचे यावेळी सांगण्यात आले. पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी त्यांचे योगदान निश्चितच मोलाचे ठरेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला. वैशाली कमाजदार यांच्या नियुक्तीमुळे पुणे शहरातील राष्ट्रवादी महिला संघटन अधिक बळकट होणार असल्याचे चित्र असून, त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

See also  इंडिया आघाडी सत्तेवर आल्यास निवडणुक रोख्यांचा तपास‌ करू : पृथ्वीराज चव्हाण - निवडणुक रोख्यातून जगातील सर्वात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप