’75’ व्या वाढदिवसा निमित्त बीज तुला करत पर्यावरणाला हातभार

बाणेर : वसुंधरा सदस्य अविनाश अत्तरदे यांच्या मातोश्री श्रीमती नलिनी अत्तरदे यांच्या 75 व्या वर्षे पदार्पणा निमित्ताने एक आगळा वेगळा असा वाढदिवस साजरा करण्यात आला .वसुंधरा अभियान बाणेर व श्री अविनाश अत्तरदे कुटुंबीय यांच्या माध्यमातून बीज तुला समारंभ घेण्यात आला.


75 वर्ष निमित्ताने आईंच्या वजना एवढ्या, देशी ६८ किलो झाडांच्या बिया संकलित करून, बीज तुला करण्यात आली.
आंबा ,फणस ,चिकू , रामफळ, सीताफळ ,ताम्हण, पळस ,बहावा ,बांबू अशा वेगवेगळ्या 30 प्रकारच्या ८०,००० पेक्षा अधिक झाडांच्या बिया गोळा करून बीज तुला करण्यात आली .
सदर बियांचे वसुंधरा अभियान बाणेर व सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई यांच्या माध्यमातून रोपण केलं जाईल.


संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सह्याद्री देवराई च्या ४० संस्था च्या माध्यमातून सदर बियांचे रोपे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लावली जातील.
वसुंधरा अभियान बाणेर व अत्तरदे फॅमिली यांच्या माध्यमातून हा सामाजिक सोहळा घेण्यात आला.
याप्रसंगी संपूर्ण अत्तरदे कुटुंबाचे नातेवाईक तसेच वसुंधराचे सदस्य उपस्थित होते.

See also  प्रत्येकाने नागरिक म्हणून कर्तव्य पालन केल्यास जीवनमान उन्नत होईल- राज्यपाल रमेश बैस