पुणे : पुणे महानगरपालिका सेवानिवृत्त शिक्षक संघटना, औंध-पाषाण-गोखलेनगर विभागाच्या वतीने शनिवार दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी आयोजित मासिक सभेमध्ये नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात नगरसेवक दत्ता बहिरट, निलेश निकम, चंद्रशेखर उर्फ सनी निम्हण आणि भक्ती गायकवाड यांचा संघटनेमार्फत सन्मान करण्यात आला. तसेच सरला चांदेरे, वसंत जुनवणे आणि संघटनेतील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित नगरसेवकांनी सेवानिवृत्त शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करत ते सोडविण्याचे आश्वासन दिले.
संघटनेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव शेटे यांनी संघटनेसाठी तब्बल २६ वर्षे कार्य केल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच नवनिर्वाचित अध्यक्ष शिवाजी जाधव यांचाही सन्मान करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जीवराज खोरे, बाचल मॅडम आणि उत्तम कदम यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास बहुसंख्य सेवानिवृत्त शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आत्माराम जाधव यांनी केले, तर आभार प्रदर्शन विठ्ठलराव शेटे यांनी मानले. संपूर्ण कार्यक्रम उत्साही वातावरणात पार पडला.

























