पाषाण : पश्चिम पुण्याचा निसर्गसौंदर्याचा अभिमान असलेला पाषाण तलाव सध्या गंभीर पर्यावरणीय संकटाला सामोरा जात आहे. नुकतीच येथे सुरू असलेल्या एस.टी.पी. (सांडपाणी शुद्धीकरण) प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी करत कोथरूड मतदार संघाचे आमदार कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकात्मक प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
काही दिवसांपूर्वी दुषित पाण्यामुळे तलावात हजारो मासे मृत्युमुखी पडल्याची घटना घडली होती. ही केवळ अपघाती घटना नसून प्रशासनाच्या दुर्लक्षाचे ठळक उदाहरण असल्याचे मत अमोल बालवडकर यांनी व्यक्त केले.स्थानिक गरजेनुसार या परिसरासाठी ५ ते ७ एमएलडी क्षमतेचा एस.टी.पी. प्रकल्प आवश्यक असताना, केवळ १ एमएलडी क्षमतेचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. परिणामी दररोज मोठ्या प्रमाणात अशुद्ध पाणी तलावात मिसळत असून पर्यावरणीय संतुलन बिघडत आहे.तसेच तलावातील जलपर्णी वेळेवर न काढल्यामुळे तिचा प्रचंड फैलाव झाला असून, जलस्रोताची गुणवत्ता खालावत चालली आहे.
या पार्श्वभूमीवर स्थानिक नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य अमोल बालवडकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर निष्काळजीपणाचा आरोप करत, “विकासकामे हा शब्दच त्यांच्या डिक्शनरीत नाही,” अशी बोचरी टीका केली.
तसेच तलावातील जलपर्णी वेळेवर न काढल्यामुळे तिचा प्रचंड फैलाव झाला असून, जलस्रोताची गुणवत्ता खालावत चालली आहे.
या पार्श्वभूमीवर स्थानिक नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य अमोल बालवडकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर निष्काळजीपणाचा आरोप करत, “विकासकामे हा शब्दच त्यांच्या डिक्शनरीत नाही,” अशी बोचरी टीका केली.
बालवडकर म्हणाले, याठिकाणी सत्ताधारी स्थानिक आमदार मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या निष्काळजीपणामुळे तसेच प्रशासनाने केल्याने चुकिच्या कामामुळे ही परिस्थिती ओढवली आहे. कोथरुड मतदारसंघ वाऱ्यावर सोडून दिलेले चंद्रकांत दादा पाटील यांनी या विषयाकडे ढुंकून ही पहिले नाही.
मनपा निवडणुकीत पाषाण भागात चंद्रकांत दादा पाटील यांनी अनेक दौरे केले लोकांना अनेक प्रलोभन दिले, पण एवढ्या छान निसर्गाची देण लाभलेला पाषाण तलाव परिसर सुधारण्यासाठी काडीचीही मेहेनत घेतली नाही. कोथरुड मतदारसंघाला कोल्हापूर आणि मुंबई मधील फक्त एक “हॅाल्ट“ समजत आहेत. त्यांच्या कडून अपेक्षा ठेवणेही चुकीचे आहे. कोथरुड करांच्या आशीर्वादाने दोन वेळा कॅबिनेट मंत्री पण मिळाले, पण त्या बदल्यात कोथरुड करांना काय मिळाले हा तपासाचा आणि कोथरुड करांनी आत्मपरीक्षण करण्याचा विषय आहे.
तसेच निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देत, पाषाण परिसराच्या विकासाकडे दुर्लक्ष झाल्याचेही त्यांनी नमूद केले. कोथरूड मतदारसंघाकडे दुर्लक्ष होत असल्याची खंतही यावेळी व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, पाषाण तलाव परिसराचे जागतिक दर्जाचे सुशोभीकरण आणि पायाभूत सुविधा विकसित करण्याचा संकल्प आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात असल्याचे सांगत, वरिष्ठ नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली हे काम पूर्ण करण्याचा विश्वासही अमोल बालवडकर व्यक्त केला. पाषाण तलावाचा प्रश्न आता केवळ स्थानिक न राहता पर्यावरण आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेशी निगडित गंभीर मुद्दा बनला आहे. नागरिकांमधूनही याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
पाषाण तलावाच्या मुद्द्यावरून कोथरूड मतदार संघातील राजकीय संघर्ष पुन्हा नव्याने समोर आला असून याला भाजपाकडून काय उत्तर दिले जाणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.
















