कळस येथील दवाखान्यात प्रसूती गृह सुरु करावे – “आप” ची मागणी

कळस : कळस येथील कै. गेनबा तुकाराम म्हस्के शासकीय रुग्णालय याचे बांधकाम पूर्ण होऊन अनेक वर्ष झाले. इमारत ही ३ मजली असून फक्त खालील भागात ओ पी डी सुरू असते. वरील दोन्ही मजले हे वापरवीण पडून आहेत.


लोकांच्या पैशातून मोठे हॉस्पिटल बांधून फक्त पडून आहे. याभागाची वाढती लोकसंख्या पाहता गरजू नागरिकांकरिता पूर्णवेळ रुग्णालय नाही. अनेक गरीब महिलांना प्रसूती साठी बाहेर खाजगी रुग्णालयात जावे लागते.

यासाठी आम आदमी पार्टी युवा आघाडी चे शहराध्यक्ष अमित म्हस्के यांनी पुणे महानगरपालिका आरोग्य विभाग व क्षेत्रीय कार्यालय यांच्याकडे वारंवार मागणी केली असता, आज सकाळी पाहणीकरिता कळस येरवडा क्षेत्रीय कार्यालय चे अतिरिक्त आयुक्त विजय नायकल व तुळशीराम नागटिळक यांनी याठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यावेळी शशिकांत साटोटे, बबन पालकर व अनेक नागरिक यावेळी उपस्थित होते.

See also  पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्यात 373 उमेदवारांची प्राथमिक स्तरावर निवड