पुराचा धोका टाळण्यासाठी २०० कोटींची तरतूद

पुणे : गेली दोन वर्षे पावसाळ्यात शहराला पुराचा तडाखा बसल्याने, तो धोका टाळण्यासाठी राज्य सरकारने २०० कोटी रुपयांची विशेष तरतूद केली आहे.मुठा नदीला पूर आल्याने सिंहगड रोडवरील विठ्ठलवाडी, नांदेड सिटी, वडगांव आदी नदी लगतच्या सोसायट्यांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यावेळी या पूरग्रस्त भागांना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली होती. विधानसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनीही पुराचा धोका कायमचा टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करू, असे आश्वासन दिले होते. त्या अनुषंगाने राज्य सरकारच्या अंदाजपत्रकात २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

मुठा नदीला पूर आल्याने सिंहगड रोडवरील विठ्ठलवाडी, नांदेड सिटी, वडगांव आदी नदी लगतच्या सोसायट्यांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यावेळी या पूरग्रस्त भागांना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली होती. विधानसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनीही पुराचा धोका कायमचा टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करू, असे आश्वासन दिले होते. त्या अनुषंगाने राज्य सरकारच्या अंदाजपत्रकात २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.विधानसभेच्या शिवाजीनगर मतदारसंघासाठी यापैकी ३५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदीनुसार कामे त्वरित व्हावीत याकरिता आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी नुकतीच नदी, नाले, ओढे यांची पहाणी महापालिका अधिकाऱ्यांसमवेत केली. औंधमधील ओढे, नाल्या लगत सीमा भिंत बांधण्याच्या सूचनाही आमदार शिरोळे यांनी दिल्या.

विधानसभेच्या शिवाजीनगर मतदारसंघासाठी यापैकी ३५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदीनुसार कामे त्वरित व्हावीत याकरिता आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी नुकतीच नदी, नाले, ओढे यांची पहाणी महापालिका अधिकाऱ्यांसमवेत केली. औंधमधील ओढे, नाल्या लगत सीमा भिंत बांधण्याच्या सूचनाही आमदार शिरोळे यांनी दिल्या.

या तरतुदीनुसार अन्य भागातही आमदारांनी कामे करून घ्यावीत आणि पुराचा धोका टाळावा अशी अपेक्षा स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केली.

महापौर मंजुषा नागपुरे यांनीही पावसाळ्यातील संभाव्य धोके टाळण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन त्यांना कामांच्या सूचना दिलेल्या आहेत.

See also  सुसरोड पाषाण येथील VJ-Indilife या व्यवसायिक इमारतीमध्ये धांगडधिंगाणा घालणाऱ्यांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची  कारवाईची मागणी