पुणे : शरदचंद्र पवार बहुउद्देशीय भवन, धनकवडी येथे अखिल भारतीय मराठा महासंघाची मराठा संवाद बैठक उत्साहात पार पडली. शहरातील मराठा व्यावसायिक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मा. रणजित बहिरट यांची ‘मराठा व्यवसाय आघाडी, पुणे शहर अध्यक्ष’ या पदी नियुक्ती करण्यात आली. गेली पाच वर्षे ते शहर उपाध्यक्ष म्हणून उत्तमरीत्या कार्यरत होते. त्यांच्या कार्याची दखल घेऊन ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. ते स्वतःह बांधकाम व्यावसायिक आहेत
या प्रसंगी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. राजेंद्र कोंढरे, नगरसेवक मा. किशोर धनकवडे, मा. नगरसेवक संदीप बेलदरे, उद्योजक मा. अनिल कोंढरे, श्री. नाना निवगुणे, श्री. नामदेव मानकर, पुणे शहर यु.अध्यक्ष युवराज दिसले, श्री. राकेश गायकवाड, हिरामण धनकवडे, रोहित रेणुसे,सचिन शिंदे, नितीन साळुंखे, अशोक साळेकर, सुनील पवार,अमर पवार यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















