पुणे : जागतिक योग दिनानिमित्त भाजपा युवा मोर्चा, कोथरुड विधानसभा मतदारसंघ (उत्तर मंडल) यांच्या वतीने पाषाण येथील आमदार चंद्रकांत दादा पाटील जनसंपर्क कार्यालयात योग शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या योग शिबिराचे नियोजन भाजपा युवा मोर्चा कोथरुड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष अनिकेत चांदेरे यांनी केले. यावेळी नागरिक, युवक, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने, प्राणायाम व ध्यानधारणा यांचे प्रशिक्षण देण्यात आले. नियमित योगामुळे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक शांतता आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश यावेळी देण्यात आला.
यावेळी प्रकाश तात्या बालवडकर,मंडल अध्यक्ष सचिन पाषाणकर, नगरसेविका रोहिणीताई चिमटे ,सरचिटणीस मोरेश्वर बालवडकर , महिला मोर्चा अध्यक्ष वैदही बापट उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी योगाचे महत्त्व सांगत नागरिकांनी आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करावा, असे आवाहन केले. “योग करा, निरोगी रहा” या संदेशासह शिबिर उत्साहात पार पडले.















