नसरापूर प्रकरणात न्याय मिळवून देणाऱ्या पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल व विशेष सरकारी वकील अजय मिसर यांचा पतित पावन संघटनेकडून सत्कार

पुणे, दि. २९ जून : नसरापूर येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीला आज विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी फाशीची शिक्षा सुनावली. अवघ्या ६० दिवसांत या खटल्याचा निकाल लागल्याने न्यायव्यवस्था आणि तपास यंत्रणेच्या कार्यक्षमतेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

या प्रकरणात विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी न्यायालयात आरोपीविरोधात भक्कम बाजू मांडली. तसेच पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथकाने अत्यंत वेगवान व प्रभावी तपास करून पुरावे सादर केल्यामुळे पीडित चिमुकलीला न्याय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

या उल्लेखनीय कार्याबद्दल पतित पावन संघटनेच्या वतीने पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल आणि विशेष सरकारी वकील अजय मिसर यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष श्रीकांत शिळीमकर, प्रदेश सचिव मनोज नायर, प्रदेश संघटक गोकुळ शेलार, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख सुनील मराठे, जिल्हाध्यक्ष दिनेश भिलारे, जिल्हा कार्याध्यक्ष संकेत माताळे, पुणे शहराध्यक्ष तेजस पाबळे, कार्याध्यक्ष गिरीश काकडे, उपाध्यक्ष प्रसाद वायकर, सहसंघटक सौरभ कुलकर्णी, सहचिटणीस राहुल शिंदे, विभाग प्रमुख आशिष बेनकर, आप्पा पोटे यांच्यासह संघटनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

See also  जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारीस मतदान; उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी