मुंबई–पुणे रेल्वे मार्गावर दरड; अनेक गाड्यांवर परिणाम, प्रवाशांना सतर्कतेचे आवाहन

पुणे, दि. ६ जुलै : मुंबई–पुणे रेल्वे मार्गावरील Tunnel No. 40 (BB EMD) येथे मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. या घटनेमुळे काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असून, काही गाड्या पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्या आहेत.

रेल्वे प्रशासनाने दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले असून, मार्ग लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी यंत्रणा कार्यरत आहे. रेल्वे अधिकारी परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून, वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासापूर्वी आपल्या गाडीची सद्यस्थिती अधिकृत माध्यमांद्वारे तपासूनच प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. मुसळधार पावसामुळे पुढील काही तास रेल्वे सेवांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने प्रवाशांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

See also  औंधगावची हजरत सय्यद लालशावली दर्गा ट्रस्ट कमिटी यांचा उर्से(उरुस) शरीफ उत्साहात साजरा