बाणेर : रोहन लेहर 3 सोसायटी, बाणेर येथे आषाढी एकादशी उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला.
या धार्मिक सोहळ्यात सोसायटीतील लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि सर्व रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. दीपक हांडोरे यांनी केले. त्यांनी आषाढी एकादशीचे महत्त्व आणि वारकरी परंपरा याबद्दल उपस्थितांना माहिती दिली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला लहान मुलांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. त्यानंतर ज्येष्ठ मंडळींनी भक्तिगीते सादर करून वातावरण आणखी पवित्र केले. सायंकाळी भक्तीभजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी सर्व उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
सोसायटीच्या रहिवाशांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून या सांस्कृतिक परंपरा जपण्याचा संकल्प व्यक्त केला. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनी या उत्सवात सहभाग घेऊन एकतेचा संदेश दिला.
















