पुणे, १ ऑगस्ट : लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी पुण्यात दाखल झाले. पुणे विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे तसेच भाजपचे पदाधिकारी आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासाठी अमित शहा यांचे पुण्यात आगमन झाले असून, त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. या पुरस्कार सोहळ्याकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले असून विविध मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
















