पुणे महापालिकेत पर्यावरण अहवालावरून खडाजंगी; बालवडकर विरुद्ध जोशी यांच्यात शाब्दिक चकमक

पुणे – पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज पर्यावरण अहवालावर चर्चा सुरू असताना नगरसेवक अमोल बालवडकर आणि भाजपा नगरसेवक पुनित जोशी यांच्यात जोरदार शाब्दिक संघर्ष उडाला. सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.पर्यावरण अहवाल सादर होत असताना नगरसेवक अमोल बालवडकर यांनी आक्षेप घेतला की, या अहवालामध्ये महत्वाकांक्षी नदी सुधार प्रकल्प आणि स्मार्ट सिटी अंतर्गत करण्यात आलेल्या गार्डन व पर्यावरण विषयक कामांचा उल्लेखच नाही. प्रशासनाने महत्वाचे प्रकल्प वगळून अहवाल सादर करणे चुकीचे असल्याचे त्यांनी सभागृहापुढे मांडले.

पर्यावरण अहवाल सादर होत असताना नगरसेवक अमोल बालवडकर यांनी आक्षेप घेतला की, या अहवालामध्ये महत्वाकांक्षी नदी सुधार प्रकल्प आणि स्मार्ट सिटी अंतर्गत करण्यात आलेल्या गार्डन व पर्यावरण विषयक कामांचा उल्लेखच नाही. प्रशासनाने महत्वाचे प्रकल्प वगळून अहवाल सादर करणे चुकीचे असल्याचे त्यांनी सभागृहापुढे मांडले.यावर भाजपा नगरसेवक पुनित जोशी यांनी तात्काळ आक्षेप नोंदवत, नदी सुधार प्रकल्प अद्याप पूर्ण झालेला नसल्याने त्याचा समावेश अहवालात केलेला नाही असे स्पष्टीकरण दिले.

यावर भाजपा नगरसेवक पुनित जोशी यांनी तात्काळ आक्षेप नोंदवत, नदी सुधार प्रकल्प अद्याप पूर्ण झालेला नसल्याने त्याचा समावेश अहवालात केलेला नाही असे स्पष्टीकरण दिले.यावर प्रत्युत्तर देताना बालवडकर यांनी प्रशासनाला कोंडीत पकडले. “मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प (STP) देखील अद्याप पूर्ण झालेले नाहीत, मग त्या अपूर्ण प्रकल्पांचा उल्लेख अहवालात कसा काय आला? मग नदी सुधार प्रकल्पाचा उल्लेख का टाळला?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

यावर प्रत्युत्तर देताना बालवडकर यांनी प्रशासनाला कोंडीत पकडले. “मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प (STP) देखील अद्याप पूर्ण झालेले नाहीत, मग त्या अपूर्ण प्रकल्पांचा उल्लेख अहवालात कसा काय आला? मग नदी सुधार प्रकल्पाचा उल्लेख का टाळला?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

वाद चिघळत असल्याचे पाहून सभागृह नेते गणेश बिडकर यांनी मध्यस्थी करत कामकाज सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही बालवडकर आक्रमक राहिले. स्मार्ट सिटी प्रकल्पाचा पर्यावरण संवर्धनासाठी नेमका काय उपयोग झाला आहे, याचा हिशेब प्रशासनाने द्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली. यावरही जोशी यांनी जोरदार आक्षेप घेत सत्ताधारी बाजू लावून धरली.

See also  कृष्णाकांत ठाणावाला यांनी वयाच्या 85 व्या वर्षी बाणेर टेकडी सर करत वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा केला

पर्यावरण अहवालामध्ये नदी सुधार प्रकल्प आणि स्मार्ट सिटी प्रकल्पांबाबत सविस्तर माहिती असलीच पाहिजे, अशी ठाम मागणी बालवडकर यांनी केली.

याचवेळी त्यांनी पर्यावरणाचा आणखी एक गंभीर मुद्दा उपस्थित केला. नदीकाठची झाडे तोडून पुणे शहराची फुफुसे काढू नका, अशी सडकून टीका करत त्यांनी प्रशासनाला इशारा दिला. तसेच, आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना अद्यापपर्यंत बूट, रेनकोट आणि हातमोजे यांसारखे सुरक्षा साहित्य पुरविण्यात आलेले नाही, ही अतिशय गंभीर बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.