स्वारद फाउंडेशनच्या अध्यक्षा स्वाती मोहोळ यांचा भाजपात प्रवेश

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात देश झपाट्याने प्रगती करत आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षावर सर्वच आपला अढळ विश्वास व्यक्त करत आहेत, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. कोथरुड मधील स्वारद फाउंडेशनच्या अध्यक्षा स्वाती मोहोळ यांचा आज भाजपमध्ये प्रवेश झाला‌. यावेळी ते बोलत होते.

यावेळी प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, भाजपा पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, महिला मोर्चा अध्यक्षा अर्चना पाटील, कोथरुड मंडल अध्यक्ष पुनित जोशी, श्याम देशपांडे, यांच्या सह भाजपाचे सर्व पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते.

नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात देश झपाट्याने प्रगती करत आहे. त्यामुळे आज देशातील प्रत्येकाचा भाजपावर अढळ विश्वास आहे. या पक्षात गुणवत्तेला नेहमीच प्राधान्य मिळते. त्यामुळे सामाजिक क्षेत्रातील अनेक कार्यकर्ते आज माननीय मोदीजींच्या नेतृत्वात भाजपामध्ये काम करण्यासाठी इच्छूक आहेत. राज्यातील अनेक दिग्गजांचा दर मंगळवारी प्रदेश कार्यालयात प्रवेश होत आहे. काही दिवसांपूर्वी श्याम देशपांडे यांचा मुंबईत प्रवेश झाला. आजही स्वाती मोहोळ यांच्या माध्यमातून जो प्रवेश होत आहे, त्यामुळे कोथरुडमधील आजच्या प्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ म्हणाले की, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यामुळे अनेक समविचारी व्यक्ती, संघटनांचे पदाधिकारी भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहे. यामुळे पक्ष संघटना दिवसागणिक मजबूत होत आहे. कोथरूड मधील आजचा पक्ष प्रवेश हा भाजपाच्या संघटन वाढीसाठी नक्कीच फायदेशीर होईल, असे त्यांनी सांगितले.

शहराध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले की, भारतीय जनता पक्षाशी आज सर्वच जोडले जात आहेत.‌आगामी काळात शहरातही अनेकजण भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

स्वाती मोहोळ म्हणाल्या की, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आणि पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे कामामुळे प्रभावित होऊन, भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहे. पक्ष संघटना जे काम देईल, ते काम प्रामाणिकपणे करीत राहीन, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

See also  लोकसभा सावत्रिक निवडणूक मतदानादिवशी मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी