काँग्रेसचे पंतप्रधान मोदींना ९ साल,९ सवाल पुस्तिकेचे विमोचन

पुणे : पुणे काँग्रेस भवन येथे अखिल भारतीय कांग्रेस कमिटी च्या प्रवक्त्या विंग कमांडर श्रीमती आनुमा आचार्य यांनी सर्व पत्रकारांशी वार्तालाप केला आणि ९साल, ९ सवाल ह्या पुस्तीके चे विमोचन केले.

यावेळी त्यांनी सांगितले की मोदी सरकार दलीत आदिवासी यांचे बद्दल खोटे प्रेम दाखवितात. फक्त मताचे राजकारण . आज मोदी सरकार नी आपल्या राष्ट्रपती माननीय द्रौपदी मुर्मु यांना पार्लमेंट च्या उद्घटनाला न बोलवून आपली मनुवादी वृत्ती दाखवली आहे. तेव्हा हा सगळा भ्रमाचा भोपळा आता फुटला आहे. लोकांना कळले आहे हे सरकार खूप जातीयवादी आहे. करनी आणि कथनी दोन्हीत फरक आहे.


यावेळी माजी आमदार उल्हास पवार, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अभय छाज्जेड , माजी महापौर कमल व्यवहारे , महारष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस उपाध्यक्ष संगीता तिवारी, नीता राजपूत , माजी नगरसेवक सुजाता शेट्टी, माजी नगरसेवक रफिक शेख, सचिन आडेकर, विशाल गुंड , गुलाम शेख, रवी आरडे उपस्थित होते.

See also  नामदेवराव जाधव राजमाता जिजाऊ मॉं साहेबांचे तोतया वंशज,- रोहित पवार