मॉडर्न महाविद्यालय गणेशखिंडच्या रा.से.यो.च्या विद्यार्थ्यांनी नवरात्रीत संकलित केले ६२८ किलो निर्माल्याचे झाडांना खत मिळणार

पुणे : गणेशखिंड येथील मॉडर्न महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजने तर्फे नवरात्रीचे नऊ दिवस राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व विद्यार्थी व ग्रीन हिल्स ग्रुपचे सदस्य चतृ:श्रृंगी येथे निर्माल्य गोळा करण्याचे काम केले आहे.


पर्यावरण जागृतीसाठी जे उपक्रम महाविद्यालयात होतात त्यामधील हा एक महत्वाचा उपक्रम महाविद्यालय गेली काही वर्षे राबवित आहे. पुणे परिसरातील चतृश्रृंगी मातेच्या परिसरात नवरात्रात मोठ्या प्रमाणात भक्त जमतात. देविला हार, फुले वाहतात.ते लगेचच निर्माल्यात फेकले जातात. त्यामधील काचा व प्लॅस्टिक वेगळे काढुन हे निर्माल्य टेकडीवर वाहुन नेले जाते. टेकडीवर खड्ड्यात त्यावर प्रक्रिया होउन त्याचे उत्तम प्रतिचे खत तयार केले जाते व टेकडीवरील झाडांसाठी उपयोगात आणले जाते.


या वर्षी १२८( ६२८ किलो) पोती फुले व हार,प्लॅस्टिक ३८ ( ८५ किलो), आगरबत्ती ११ पोती गोळा करण्यात आल्या. या मधील हारफुले डोंगरावरच्या खड्यात खत होण्यासाठी टाकण्यात आली. सर्व प्रक्रियेनंतर हेच खत चतुर्श्रुंगी टेकडीवरील वनस्पतींना टाकण्यात येणार आहे.
या सर्व कामात राष्ट्रिय सेवा योजनेचे सर्व विद्यार्थी स्वयंसेवकांनी काम केले. या वर्षी राष्ट्रीय सेवा योजने चे 100 विद्यार्थी व प्रा कुमोद सपकाळ (कार्यक्रम अधिकारी),डाॅ मंजूषा कूलकर्णी, डाॅ गोविंद कांबळे सह कार्यक्रम अधिकारी यांनी सहभाग घेतला.
या उपक्रमाला, प्राचार्य डॉ संजय खरात, उपप्राचार्य यांनी मार्गदर्शन केले आहे. पी. ई. सोसाइटीचे सहकार्यवाह प्रा सुरेश तोडकर व डॉ प्रकाश दिक्षित, उपकार्यवाह यांनी कौतुक केले.

See also  नवीन इमारत बांधकाम व दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करा - मंत्री चंद्रकांत पाटील