विविध शासकीय योजनांद्वारे ५,२४१ नागरिकांना वैद्यकीय सेवेचा लाभ -आमदार हेमंत रासने

पुणे : विविध शासकीय योजनांद्वारे कसबा विधानसभा मतदारसंघातील ५,२४१ नागरिकांना वैद्यकीय सेवेचा लाभ मिळवून देण्यात आला असल्याची माहिती आमदार हेमंत रासने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे

.वैद्यकीय सेवा नागरिकांना सहज मिळावी, याकरीता जनसंपर्क कार्यालयात आयुष्मान भारत योजना मिशन कक्षाची स्थापना करण्यात आली. याद्वारे कक्षात आलेल्या नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्या जाणून घेतल्या आणि त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला. जनसंपर्क कार्यालयात नागरिकांना योग्य ते मार्गदर्शन लाभल्याने योजनांचा लाभ घेणे सहज शक्य झाले, असे आमदार रासने यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

या योजनांमधून मोतीबिंदू शस्त्रक्रिया , हृदय शस्त्रक्रिया, कॅन्सर आजारावरील उपचार, लहान मुलांवरील हृदय शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या. डायलिसिस, खुबा प्रत्यारोपण, एमआरआय, एक्स रे, सिटीस्कॅन अशा सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या. दिव्यांग व्यक्तिंना कृत्रिम उपकरणे मोफत देण्यात आली. याखेरीज मुख्य मंत्री सहाय्य निधीतून निधी मिळवून देणे, वैद्यकीय बिलात सवलत मिळवून देणे अशाप्रकारे नागरिकांना सहाय्य करण्यात आले, असे आमदार रासने यांनी पत्रकात म्हटले आहे.

या वैद्यकीय सेवेसाठी सूर्या सह्याद्री हॉस्पिटल, युनिव्हर्सल हॉस्पिटल, इनलॅक्स बुधरानी हॉस्पिटल, देवयानी हॉस्पिटल, सिल्व्हर चर्च हॉस्पिटल, सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालय, ससून सर्वोपचार रुग्णालय, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, एच.व्ही.सरदेसाई हॉस्पिटल, पूना हॉस्पिटल,या शिवाय अलायन्स क्लब, ॲलिम्को (मुंबई), मुख्य मंत्री सहाय्यता कक्ष या सर्वांचे सहाय्य मिळाले. त्यांनी शासकीय योजनांची अंमलबजावणी करून रुग्णांना दिलासा मिळवून दिला, असे रासने यांनी पत्रकात म्हटले आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना वैद्यकीय सेवेचा लाभ मिळवून देण्यासाठी आयुष्मान भारत योजना मिशनचे डॉ.ओमप्रकाश शेटे, मुख्य मंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे रामेश्वर नाईक आणि याच योजनेचे पुणे विभाग प्रमुख डॉ.मानसिंग साबळे, पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुख डॉ.बोराडे मॅडम, आरोग्य समन्वयक राजेंद्र परदेशी, विनायक रासने यांचे सहाय्य लाभले, त्यातून वैद्यकीय सेवेचे कार्य यशस्वी झाले, यापुढेही हे काम चालू राहील, अशी माहिती आमदार हेमंत रासने यांनी प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.

See also  हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये ईगल वॉरियर विजेता