चिखली नगरात संघाचे पथसंचलन आणि शस्त्रपूजन उत्साहात

चिखली नगर, प्रतिनिधी : विजयादशमीनिमित्त चिखली नगरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने पथसंचलन आणि शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ८० स्वयंसेवकांच्या सहभागातून शिस्त, एकता आणि संघभावनेचे दर्शन घडले.

निवळे वस्ती ते गणेश सिद्धी सोसायटी या मार्गावर गणवेशधारी स्वयंसेवकांचे शिस्तबद्ध पथसंचलन पार पडले. मार्गावर नागरिकांनी पुष्पवृष्टी करत स्वयंसेवकांचे स्वागत केले. पथसंचलनानंतर पारंपरिक पद्धतीने शस्त्रपूजन करण्यात आले.

विजयादशमीच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमातून भारतीय संस्कृती, परंपरा, शिस्त आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी पोलीस बांधवांचे मोलाचे सहकार्य लाभले.

८० स्वयंसेवकांचा उत्स्फूर्त सहभाग, नागरिकांचे स्वागत आणि पोलिसांचे सहकार्य यामुळे चिखली नगरातील विजयादशमीचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

See also  औंध मध्ये रामदेव ज्वेलर्स वर सशस्त्र दरोडा टाकण्याचा प्रयत्न एक जण गंभीर जखमी; हल्लेखोर गाडी सोडून पळाले