औंध मोहल्ला कमिटी बैठकीत मुख्य खात्यांच्या अधिकाऱ्यांचे अनुपस्थिती, नागरिकांनी वाचला समस्यांचा पाढा

औंध : नागरिकांचे प्रश्न मांडण्याचे हक्काचे व्यासपीठ असलेल्या मोहल्ला कमिटीच्या बैठकीला मुख्य खात्याचे अधिकारी उपस्थित रहात नाहीत यामुळे नागरिकांची मुख्य खात्याशी संबंधित असलेली कामे पूर्ण होत नसल्याची तक्रार नागरिकांनी औंध क्षेत्रीय कार्यालयात मोहल्ला कमिटीमध्ये केली.

औंध क्षेत्रीय कार्यालयामध्ये मोहल्ला कमिटीच्या बैठकीमध्ये पुणे शहरात विविध प्रकल्प अंतर्गत वृक्षतोडीच्या प्रस्तावाला विरोध करण्यात आला व निषेध व्यक्त करण्यात आला.

तसेच औंध क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत वाढलेली कुत्र्यांची संख्या यांचा नागरिकांना होणारा त्रास यावर चर्चा करण्यात आली.
निम्हण मळ्यातील तुटलेली ड्रेनेज दुरुस्त करण्याची मागणी, तसेच सुस म्हाळुंगे बाणेर बालेवाडी मधील पाणी प्रश्न व सुसगाव येथील स्मशानभूमी जवळील पुलाचे राहिलेले काम , अंगणवाड्यांची दुरुस्ती, तसेच कचरा समस्या पुणे महानगरपालिकेच्या विद्युत खांबांवर लटकणाऱ्या अनाधिकृत केबल काढण्याविषयी नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले.

परिहार चौकातील अपूर्ण असलेल्या राजमाता जिजाऊ स्मारकाच्या परिसरातील अस्वच्छता व राहिलेले अपूर्ण काम याबाबत वाडेकर यांनी प्रश्न उपस्थित केले.

तर औंध परिसरातील पालिका वसाहतींचे प्रश्न, हॉस्पिटल बिलांवरून होणारी नागरिकांची लूट, भैरवी हॉटेल ते अलोमा दरम्यान ओढ्यातील फुटलेली ड्रेनेज लाईन, भटकी कुत्री, नदीपात्रातील जलपर्णी व वाहतूक कोंडी संदर्भामध्ये नाना वाळके यांनी लेखी निवेदन दिले.

यावेळी औंध पाषाण लिंक रोड विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्र चत्तुर यांनी देखील बाणेर पाषाण लिंक रोड परिसरातील मांडल्या.

मोहल्ला कमिटीच्या बैठकीत नागरिकांनी मांडलेले प्रश्न तातडीने सोडवण्यात यावेत याकडे दुर्लक्ष करण्यात येऊ नये अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली.

See also  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते म्हाळुंगे बालेवाडी येथे ऑलिम्पिक भवन व म्युझियमचे भूमिपूजन