वंचित बहुजन आघाडी च्या वतीने सुसमध्ये आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर तसेच शाखांचे उद्घाटन

सुस : वंचित बहुजन आघाडी पुणे शहर व कोथरूड विधानसभा च्या वतीने ॲड. माजी खासदार बाळासाहेब आंबेडकर यांच्या १० मे स्वाभिमान दिन, वाढदिवसाच्या निमित्ताने महाआरोग्य शिबीर व रक्त दान शिबीर , शाखा उद्घाटन,व पक्ष प्रवेश कोथरूड विधानसभा अंतर्गत सुस गाव येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी प्रमुख उपस्थित महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अनिल जाधव, प्रदेश उपाध्यक्ष ॲड. सर्वजित बनसोडे, प्रदेश प्रवक्ते ॲड.प्रियदर्शी तेलंग, तक्रार निवारण समिती अध्यक्ष प्रा.विष्णु जाधव , पुणे शहर अध्यक्ष मुनव्वर भाई कुरेशी, महिला अध्यक्षा अनिता ताई चव्हाण, महिला महासचिव सारिका फडतरे, महासचिव ॲड. अरविंद तायडे, सुनील धेंडे, शहर उपाध्यक्ष विकास भेगडे पाटील, बापू साहेब बनसोडे, झाकिर शेख,अजय भालशंकर, विनोद जाधव, संघटक सतीश रणवरे, रफिक शेख, जीवन रोकडे, सचिव प्रा.सावळे सर , प्रसिद्ध प्रमुख गौरव जाधव, नवनीत आहिरे, शिवसेना नेत्या ज्योती ताई चांदेरे, कोथरूड वि.स.अध्यक्ष दिपक कांबळे, खडकवासला वि.स. राजेंद्र सोनवणे, हडपसर वि.स.महासचिव हरिभाऊ वाघमारे, उपाध्यक्ष जीवन गाडे,
कोथरूड वि.स.महासचिव विजय प्रधान, संतोष लोंढे, उपाध्यक्ष राम चव्हाण, प्रविण सोनवणे, साहेबराव मंजुळकर , दत्ता शेंडगे, संघटक नारायण जाधव, सचिव राहुल वाघमारे, सुहास जाधव, रोहिदास चांदेरे, जालिंदर गायकवाड, प्रल्हाद निकाळजे, विवेक निकाळजे, दिपक कदम, छ.शिवाजी नगर वि.स.उपाध्यक्ष प्रभू पटेकर व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी ८० रक्तदात्यांनी रक्तदान केले तर शेकडो नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमाला सुसगाव परिसरातील नागरिक व विविध सोसायटी यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

See also  बाणेर परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड, पर्यावरण प्रेमी नागरिकांची कारवाईची मागणी