औंध क्षेत्रीय कार्यालयामध्ये आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची नागरिकांच्या समस्या संदर्भात बैठक

औंध : आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या अध्यक्षतेखाली औंध – बोपोडी येथील नागरिकांच्या समस्यांसंदर्भात औंध वार्ड ऑफिसर व अधिकारी यांच्याबरोबर औंध वार्ड ऑफीस मध्ये बैठक आयोजन करण्यात आले होते.

यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे, माजी नगरसेविका अर्चना मुसळे, माजी नगरसेवक बंडू ढोरे, माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, मधुकर मुसळे, आनंद छाजेड, बाळासाहेब रानवडे, सचिन वाडेकर, गणेश कलापुरे, निलेश जुनवणे, सचिन मानवतकर, वसंत जुनवणे आदी उपस्थित होते.

यावेळी नागरिकांनी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या सानेवाडी आणि प्रश्न भटके कुत्र्यांचा विषय तसेच चाळीस टक्के कर सवलतीची प्रक्रिया सुलभ करण्यात संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित केले.
औंध क्षेत्रीय कार्यालयांतर्गत वाढलेली अतिक्रमणे, पादचारी मार्गावरील समस्या तसेच ऑनलाईन तक्रारी गेल्यानंतर काम करतात तक्रारी पूर्ण झाल्याचे दाखवण्यात येते. आंबेडकर चौक येथील अनाधिकृत दुकाने, नागरिकांनी प्रश्न मांडल्यानंतर अधिकारी उपलब्ध नसणे, वारंवार अर्ज केल्यानंतरही त्याची दखल योग्य वेळी घेतली जात नसल्याच्या तक्रारी यावेळी नागरिकांनी आमदार सिद्धार्थ शिरोळे व सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांच्याकडे केल्या.

क्षेत्रिय कार्यालया अंतर्गत येणाऱ्या समस्यांची पाहणी करून त्या तातडीने सोडवण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील. तसेच नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी औंध क्षेत्रीय कार्यालयात महिन्यातून किमान दोन वेळा बैठकीचे आयोजन करण्यात येईल असे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले.

या बैठकीला आमदार सिद्धार्थ शिरोळे वेळेवर उपस्थित होते तर पालिकेचे अधिकारी वेळेवर उपस्थित न झाल्याने नागरिकांनी यावेळी नाराजी व्यक्त केली.

यावेळी औंध, बोपोडी, सानेवाडी, डीपी रोड तसेच वस्ती परिसरातील नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

See also  खडकीकडे जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरून आता दुहेरी वाहतूक