वायरलेस कॉलनी कडून ॲड. डॉ. मधुकर मुसळे व माजी नगरसेविका सौ. अर्चना मुसळे यांचा जाहीर सत्कार

औंध : ॲड. डॉ. मधुकर मुसळे व माजी नगरसेविका सौ अर्चना मुसळे यांनी गेल्या अनेक वर्षापासून भाजप कार्यकर्ता/लोकप्रतिनिधी म्हणून औंध भागाचा काय पालट करीत असताना वायरलेस कॉलनी व वायरलेस कॉलनी फोरम परिसरातील बहुतेक सर्व विकास कामे पूर्ण केली आहेत.अत्यंत निर्भीड विश्वासहार्य व कमिटेड नेतृत्व म्हणून ॲड डॉ मधुकर मुसळे व मा. नगरसेविका सौ अर्चना मुसळे यांनी नागरिकांच्या मनामध्ये स्थान मिळवले आहे असे भावना व्यक्त करीत मुसळे दांपत्याने विकास कामांसाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा गौरव करीत श्री विद्याधर भापकर यांनी कॉलनीच्या वतीने दोघांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.


जनसामान्यांची सेवा करीत असतानी त्यांचे मिळत असलेले उत्कट प्रेम, आदर व आशीर्वाद यामुळे पुढे सतत कार्यरत राहण्यासाठी प्रेरणा ऊर्जा व उत्साह मिळते व त्याच प्रेरणेतून /सद्भावनेतून आम्ही सतत सेवा कार्य करीत राहू असे ॲड. डॉ. मधुकर मुसळे यांनी सांगितले.

यावेळी श्री विद्याधर भापकर, डॉक्टर शुभदा चांदुरकर, श्रीमती नीलिमा घाणेकर, अरुण भापकर, श्री सतीश जोशी ,श्री निलेश दीक्षित, श्री नंदकुमार कुलकर्णी, डॉक्टर चांदोरकर, श्री सुधीर मोरे, श्री ढेकणे, कौलगुड मॅडम त्यांच्या सह अनेक जण उपस्थित होते.


See also  राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या सदस्यांकडून बार्टी संस्थेच्या योजनांचा आढावा