मराठा संघर्ष योद्धा मनोज जारंगे पाटील यांच्या उपोषणाला सिंहगड रोड मराठा क्रांती मोर्चा जाहीर पाठिंबा

पुणे : मराठा क्रांती मोर्चा कडून हिंगणे खुर्द वडगाव बुद्रुक सिंहगड रोड पुणे येथे एक दिवसीय साखळी उपोषण करण्यात आले. सरकारने मराठा समाजाला दिलेले 40 दिवसाचे आश्वासन पाळले नाही म्हणून मा. मनोज जारंगे पाटील पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे उपोषणास बसलेले आहेत.

त्यांना पाठिंबा म्हणून सिंहगड रोड मराठा क्रांती मोर्चा तर्फे हिंगणे खुर्द येथे एक दिवसीय उपोषण करून माननीय जिल्हाधिकारी यांच्यामार्फत व पोलीस (गृहविभाग) यांच्या मार्फत महाराष्ट्र सरकारला निवेदन देण्यात आले. यावेळी मराठा आरक्षण अभ्यासक मा. राजेंद्रजी कोंढरे, राजेंद्र कुंजीर यांनी मार्गदर्शन केले ह्या कार्यक्रमाचे आयोजन आबासाहेब जगताप, रमेश दौंडकर, युवराज दिसले, सुभाष ढमाले, बाळासाहेब कडु, जयनाथ जगताप, शिवाभाऊ पासलकर, अश्विनी खाडे, श्रावणी जगताप, चंदन कड, तुषार गोसावी, शरद जगताप यांनी केले सदर उपोषणासाठी सिंहगड रोड भागातील सर्व समन्वयक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

See also  निरोगी जीवनासाठी मौखिक आरोग्य जपणे महत्त्वाचे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ; स्वच्छ मुख अभियानाचे सचिन तेंडुलकर सदिच्छादूत