पाषाण : विघ्नहर्ता नागरी सहकारी पतसंस्था मर्या. पुणे या संस्थेची रौप्यमहोत्सवी २६ ची वार्षीक सर्वसाधारण सभा कुंदन मंगल कार्यालय बाणेर, पुणे या ठिकाणी नुकतीच आयोजीत करण्यात आली. संस्थेने ९ टक्के लाभांश जाहीर केला तसेच सभासदांच्या शेअर्स प्रमाणे त्यांच्या शेअर्सच्या प्रमाणात बक्षिस म्हणुन शेअर्स मध्ये वाढवुन देण्यात आले.
संस्थेचे संचालक श्री. रामदास कुदळे यांनी अहवाल वाचन करत असताना गेल्या २५ वर्षीच्या प्रगतीचा आढावा सांगितला. तसेच रौप्यमहोत्सवी वर्षा निमित्त महिलांसाठी धनवर्षा योजना चालु करण्यात आल्याचे सागितले या योजनेला
२५ महिण्यांकरीता वार्षीक ९.५० टक्के व्याजदर जाहिर करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या विद्यमान चेअरमन श्रीमती भारती विधाते होत्या त्यांनी तिसरी शाखा लवकरचसुरु करत असुन गेली २५ वर्ष आपण सर्वांनी जे सहकार्य केले ते पुढे हि देत रहाल अशी भावना व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन आचार्य निरामय योग चिकीत्सा केंद्राचे संस्थापक अध्यक्ष योगाचार्य केदारनाथ पारगावकर उपस्थित होते त्यांनी दैनंदिन आरोग्य, आहार, व्यायाम, प्राणायाम इ. जीवन शैली विषयी मार्गदर्शन केले ते म्हणाले संस्थेने उत्तम प्रगती केली असुन संस्था स्थापने पासून सतत ऑडीट वर्ग अ प्राप्त केला आहे संस्थेच्या स्व मालकीची दोन प्रशस्त कार्यालये आहेत हि कौतुकास्पद बाब आहे.
संस्थेचे ऑडीटर व्हि. एन. वाणी (पाखले) साहेब यांनी रौप्य महोत्सव सादर करताना २५ कोटीचे ध्येय. धोरण समोर ठेवले पाहिजे त्या दृष्टीने संस्थेने वाट चाल केली पाहिजे, त्यांनी संस्थेच्या प्रगतीचा शाखा विस्ताराचा आढावा सांगीतला. तसेच संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेची 25 वर्षाच्या प्रगतीच्या वाटचालीची ऑडिओ क्लिप संस्थेचे श्री सोमनाथ कदम व साई कदम यांनी स्कीनवर दाखवली.
यावेळी अंतरराष्ट्रीय कुस्ती पटु पै. शिवराज बालवडकर व सी. ए. ओंकार कुलकर्णी, सी.ए.प्रतिक कदम तसेच इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंत ७० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून उतीर्ण झालेल्या सभासदांच्या मुलांचा यावेळी शालेय उपयोगी वस्तुंचे वाटप करुन सत्कार करण्यात आला. या वेळी संस्थेच्या सेक्रेटरी सौ. मनिषा कदम, खजिनदार तुकाराम ठोंबरे, संचालक किशोर जाधव, प्रकाश दर्शने, नंदकुमार कलाटे, हिराबाई बामगुडे, सुनिल चासकर, रोहिदास कोकाटे व्यवस्थापक सुधाकर मोरे, तसेच कर्मचारी, अभिकर्ता प्रतिनिधी, सभासद, ठेवीदार व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री संजय घुले व श्री गणेश कदम यांनी केले तर व्हाँ. चेअरमन प्रकाश गायकवाड यांनी आभार मानले.