राष्ट्रवादी काँग्रेस छत्रपती शिवाजी नगर विधानसभा अध्यक्षपदी अभिषेक बोके यांची निवड

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या छत्रपती शिवाजी महाराज नगर विधानसभा अध्यक्षपदी श्री.अभिषेक बोके यांची निवड करण्यात आली .राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी ही निवड केली .


अभिषेक बोके हे पवार कुटुंबातील सदस्य आहेत. त्यांनी यापूर्वी राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम उत्कृष्ठपणे पाहिले होते.त्याच बरोबर सावित्रीबाई फुले विद्यापीठ आदीसभा सदस्य म्हणून देखील काम पाहिले होते.


या निवडीवेळी सुनील तटकरे, शहराध्यक्ष दीपक मानकर,रुपाली चाकणकर, प्रदीप देशमुख तसेच नवनिर्वाचित पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

See also  मराठ्यांना आरक्षण देणारच -एकनाथ शिंदेंचा निर्धार; भाषण सोडून शिवरायांच्या पुढे नतमस्तक