काँग्रेसमध्ये स्वाभिमान गहाण ठेवलेल्या आणि भाजपात जाऊन स्वाभिमान विकलेल्या राणेंची किंमत चाराणें राहिली असल्याचे टीका शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे यांनी केली

पुणे : पुणे शहरात भाजपच्या राज्यस्तरीय बैठकीला उपस्थित आमदार नितेश राणे यांना पुणे शहरातील महिला पत्रकार यांनी विचारलेल्या कपडे बदलता तसे पक्ष बदलता प्रश्नांवर उत्तर नव्हतेच त्यामुळे देता आले नाही. राम गणेश गडकरी यांचा छत्रपती संभाजी महाराज उद्यानातील पुतळा काढताना RSS ला उद्देशून हाफ चड्डी म्हणालेले नितेश राणे भाजप मध्ये जाऊन हिंदुत्व चे गाणे गाऊ लागले. नितिमत्ता नसलेल्या राणेंना पुणेकर पत्रकारांना उत्तर देता येत नाही. विषयांतर करण्यासाठी वडीलधारे जेष्ठ नेते, राज्यसभा खासदार संजय राऊत यांस पोलीस संरक्षण सोडून येण्याचे आणि त्यांचे पाय मोडण्याची भाषा करून आव्हान देणाऱ्या, तसेच सांस्कृतिक राजधानीत येऊन पुणे शहराची शांतता भंग करणाऱ्या नितेश राणेवर महाराष्ट्राचे सरकार कारवाई करणार का ? असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे शहरप्रमुख संजय मोरे यांनी पत्रकार द्वारे सांगितले.

याबाबत किमान विचारविनिमय करतील कि नाही याबाबत शंकाच आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बोलबच्चन आमदार खुलेआम धमकी देत आहे, पुणे शहराच वातावरण बिघडवीत आहे असे असताना त्यावर कारवाई करण्याची हिम्मत फडणवीसांमध्ये आहे का ? इतर पक्षातील आमदार , पदाधिकारी ह्यांनी अशी भाषा वापरली असती तर त्यांच्यावर हक्कभंग , कारणे दाखवा नोटीस, पोलीस तक्रार असे प्रकार झाले असते. ह्याच उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी द्यावे, आणि गृहमंत्री पदाची गरीमा टिकवावी.
शिवसेना पुणे शहराच्या वतीने आव्हान देण्यात येते की नितेश राणेंनी दुसर्‍यांचे संरक्षण काढा म्हणण्यापेक्षा अगोदर आपल्या सरकारी आणि बिनसरकारी संरक्षण सोडून ये. समवयस्क निष्ठावंत शिवसैनिक तुला तुझ्याच भाषेत कुस्तीच्या आखाड्यात अस्मान दाखवतील. एकदा होउन जाऊ देत.. म्हणजे कायमची वायफळ बडबड बंद होईल. तू शिवसैनिक होतास भूतकाळात… आम्ही भूत, वर्तमान आणि भविष्य काळातही शिवसैनिकच आहोत आणि कायम राहू.
काँग्रेसमधे असताना स्वाभिमान गहाण ठेवलेल्या आणि भाजपात जाऊन स्वाभिमान विकलेल्या चाराणेंनी शिवसैनिकांना शिकवू नये अशी टिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे शहर प्रमुख संजय मोरे यांनी केली आहे.

See also  पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेत सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आवाहन