मानवी युवा विकास संस्था व हडपसर पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणारा “संदीप जगदाळे स्मृती पुरस्कार” पत्रकार श्रीकिशन काळे व पत्रकार मिकी गई यांना जाहीर

कै. पत्रकार संदीप जगदाळे

पुणे : मानवी युवा विकास संस्था व हडपसर पत्रकार संघाच्या वतीने समाजामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे पत्रकार, सामाजिक कार्यकर्ता, स्वयंसेवी संस्था व पोलिसांना “पत्रकार संदीप जगदाळे” यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा “संदीप जगदाळे स्मृती पुरस्कार” रविवार दिनांक २१ मे २०२३ रोजी, हडपसर डीपी रोड, नोबल एचएमए हॉल मध्ये होणार आहे.

पत्रकारिता मध्ये लोकमतचे जेष्ठ पत्रकार श्रीकिशन काळे व एबीपी माझाचे जेष्ठ पत्रकार मिकी घई यांना देण्यात येणार आहे. तर सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे समाजसेवक रवींद्र झांबरे, पैगंबर शेख यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. हडपसर उपनगर परिसरामध्ये आपत्ती व्यवस्थापन मध्ये काम करणारा युवक आझादसिंग टाक यांना ही पुरस्काराने सम्मानित करण्यात येणार आहे. तर पोलीस प्रशासनामधील व मूळचा हँडबॉल चा खेळाडू व प्रशिक्षक असलेले तानाजी देशमुख यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये सामाजिक भान ठेवून समाजामधील दुःख आपलसे करून घेणारे गंगा तारा वृद्धाश्रमाच्या संस्थापिका नीता भोसले व ॲड. लक्ष्मी माने यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.

संदीप जगदाळे हे दैनिक सकाळ व लोकमत वृत्तपत्रातून त्यांनी पत्रकारिता केली होती. करोनाच्या काळामध्ये त्यांचा १३ मे २०२१ रोजी अकाली निधन झाले. समाजामधील विविध प्रश्नाला त्यांनी आपल्या बातमीद्वारे प्रकाश टाकला होता. त्याचबरोबर निराधार लोकांना स्वतःचे घर मिळवून देणे, रस्त्यावरील बेवारस लोकांना उपचार करणाऱ्या डॉक्टरांची बातमी करणे, हडपसर मधील बेटी बचाव बेटी पढाव या अभियानाचे डॉ. गणेश राख यांच्या उपक्रमाला ही त्यांनी प्रथम जगासमोर आणले होते. समाजामधील नवतरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील होते. तृतीयपंथी,दिव्यांग,डोंबारीची मुले च्या हक्कासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते.

See also  सायबर कॉमिक बुकचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या हस्ते अनावरण