पुणे लोकसभा पोटनिवडणुक लवकरच लागणार,” राष्ट्रवादीही इच्छुक अजित पवारांनी दिले संकेत

पुणे : भाजप खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेली पुणे लोकसभेची पोटनिवडणुकीबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. संविधानाच्या नियमानुसार सहा महिन्याच्या आता निवडणुक घेणं अनिवार्य असल्याने ही पोटनिवडणुक होण्याची शक्यता आहे. यासाठी भाजप अन् महाविकास आघाडीकडून चाचपाणी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मला एक बातमी अशीही कळली आहे. मला वाटतं होतं की लोकसभा निवडणुकीला एक वर्ष राहिलंय. त्यामुळे पोटनिवडणुक लागणार नाही.पण बहुतेक पुण्यातील पुणे लोकसभा मतदारसंघात गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणुक लागण्याची शक्यता आहे. अशी माझी आतल्या गोटातली माहिती असल्याचं अजित पवारांनी सांगितलं आहे.


दरम्यान, पुणे लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काॅंग्रेसचीची जास्त ताकद आहे. शिवाय पुणे लोकसभा मतदारसंघ हा काॅंग्रेसचा पारंपारिक मतदारसंघ आहे. त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुक राष्ट्रवादी काॅंग्रेस लढवणार असल्याचंही अजित पवारांनी सांगितलं आहे. यासोबतच प्रशासनाने लोकसभा निवडणुकीसाठी लागणारे सर्व साहित्य मागवून घेतले आहेत. तसेच मतदार केंद्राची पाहणी देखील सुरू करून दिली आहे. त्यामुळे याठिकाणी आता लवकरच पोटनिवडणुक लागण्याची शक्यता सर्व स्तरातून वर्तवली जात आहे.

See also  शरद पवार,अजित पवार व सुप्रिया सुळे भेट नंतर दादा दिल्लीला रवाना