पद्मश्री शाहीर कृष्णराव साबळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे ‘रंग शाहिरीचे’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई, : पद्मश्री शाहीर कृष्णराव साबळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे ‘रंग शाहिरीचे’ हा सांस्कृतिक कार्यक्रम आज सायंकाळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात आयोजित करण्यात आला होता.

यावेळी शाहीर साबळे यांच्या पत्नी माई साबळे, कन्या अभिनेत्री चारुशीला साबळे- वाच्छानी, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, उपसचिव विलास थोरात, गायक नंदेश उमप, प्रा . डॉ. गणेश चंदनशिवे, प्रा. डॉ. प्रकाश खांडगे, शाहीर कैलास महिपती, अंबादास तावरे, संजय साबळे, नाना निकम आदी उपस्थित होते. यावेळी शाहीर साबळे यांच्यावर तयार केलेली लघुचित्रफित दाखविण्यात आली.

प्रधान सचिव श्री. खारगे म्हणाले, लोककलेत मनोरंजनाबरोबर समाज प्रबोधनाची ताकद आहे. हीच बाब लक्षात घेवून शाहीर साबळे यांनी समाजाचे प्रबोधन केले. त्यांनी ‘महाराष्ट्राची लोकधारा’ सारख्या कार्यक्रमातून महाराष्ट्राची संस्कृती घराघरापर्यंत पोहोचविली. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शासनातर्फे राज्यभर विविध कार्यक्रम आयोजित केले जातील. त्यासाठी समितीचे गठण करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे, गायक नंदेश उमप, दिग्दर्शक संतोष पवार, नागेश मोरवेकर, शाहीर अजिंक्य लिंगायत, चारुशीला साबळे- वाच्छाणी, विवेक ताम्हणकर, सुभाष खरोटे, प्रमिला लोदगेकर, हेमाली म्हात्रे आदी कलावंतांनी शाहिरी गीते सादर केली. तसेच लोककलेचे विविध प्रकार सादर करीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

See also  आकड्यांच्या पलिकडचा एक्झिट ट्रेंड काय?