काॅंग्रेसच्या बालेकिल्ल्यात नांदेडमध्ये अमित शहा यांची जाहीर सभा, काहीही होणार नाही, अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया

नांदेड : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून त्यांच्या नांदेड येथे जाहीर सभा होणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला नऊ वर्ष पुर्ण झाल्यानिमित्त भाजप देशभर विविध कार्यक्रम आयोजित करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून गृहमंत्री शाह नांदेड दौऱ्यावर आले आहेत. १०, ११ जून रोजी विविध चार राज्यात ते जाहरी सभा घेणार आहेत. त्यातील एक सभा नांदेडमध्ये होत आहे. ही सभा काॅंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नांदेड मतदार संघात होत आहे.

अमित शाह यांचे नांदेडमध्ये स्वागत आहे. पण नांदेडच्या जनतेची साथ काॅंग्रेसला आहे, हा आजपर्यंत अनुभव आहे. भाजपच्या सर्व्हेत नांदेड जिल्हा त्यांच्यासाठी कमकुवत आहे. ज्याठिकाणी भाजप कमकुवत आहे, त्याठिकाणी पक्षाकडून जोर लावला जात आहे. असं माजी मुख्यमंत्री आणि काॅंग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

See also  राष्ट्रवादीला धोबीपछाड देत भाजपाचा पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिरकाव : अजितदादांना धक्का