श्री सद्गुरु संतवर्य योगीराज शंकर महाराज समाधी ट्रस्ट तर्फे मोफत आरोग्य शिबिर संपन्न

धनकवडी : श्री सद्गुरु संतवर्य योगीराज शंकर महाराज समाधी ट्रस्ट च्या वतीने मोफत आरोग्य शिबिर संपन्न झाले.
माय माऊली केअर सेंटर लायन्स क्लब ऑफ पुणे कात्रज, एच व्ही देसाई हॉस्पिटल मंहमदवाडी भारती हॉस्पिटल पुणे. यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी, मोफत कान नाक घसा तपासणी, मोफत त्वचारोग तपासणी, स्त्री रोग तपासणी, हाडांची तपासणी, जनरल चेकअप तपासणी, व मोफत औषधे वाटप असे भव्य आरोग्य शिबिर श्री. सद्गुरू शंकर महाराज समाधी मठ सातारा रोड धनकवडी पुणे येणाऱ्या सर्व भक्तांसाठी शिबिराचे आयोजन केले होते.

नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. 436 नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.
या कार्यक्रमाला उपस्थित धर्मदाय आयुक्त पुणे सुधीर बुक्के, गुप्ता साहेब यांचे हस्ते दीप प्रज्वलन करून आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार अमोल कोल्हे यांनी श्री सद्गुरु संतवर्य योगीराज शंकर महाराज मठाला सदिच्छा भेट दिली व दर्शना नंतर त्यांनी मठातील आरोग्य शिबिराला सदिच्छा भेट दिली.

या वेळी माजी महापौर दत्तात्रय धनकवडे ,शंकर महाराज समाधी ट्रस्टचे अध्यक्ष सुरेंद्र वाईकर, विश्वस्त निलेश मालपाणी, सतीश कोकाटे, मिहीर कुलकर्णी, राजाभाऊ सूर्यवंशी, डॉक्टर पी डी पाटील, प्रताप भोसले माय माऊली केअर सेंटर व लायन्स क्लब ऑफ पुणे कात्रज चे संस्थापक अध्यक्ष ला. विठ्ठलराव वरुडे पाटील, ला.विशाल वरुडे पाटील, ला. हेमलता जैन, ला.संगीता वरुडे पाटील, ला.अश्विनी वरुडे पाटील, आयोजक श्री. सद्गुरु शंकर महाराज समाधी ट्रस्टचे विश्वस्त आणि मित्र परिवार सामाजिक क्षेत्रात काम करणारे स्थानिक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.

See also  अखिल भारतीय मराठा महासंघ, पुणे शहर उपाध्यक्ष पदी सुभाषराव ब.ढमाले यांची नियुक्ती