लेशपाल जवळगे यांचा सरहद तर्फे सन्मान

पुणे: पुण्यातील सदाशिव पेठेत एका तरूणीवर प्राणघातक हल्ला झाला तिचे प्राण वाचविण्यासाठी धाडस दाखवणार्‍या लेशपाल जवळगे यांचा कात्रज येथील सरहद कॉलेज ऑफ आर्टस्, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कात्रज पुणे येथे सत्कार करण्यात आला आहे. सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. संजय नहार यांच्या हस्ते लेशपाल जवळगे यांचा सत्कार करण्यात आला.

श्री. नहार म्हणाले, आजच्या समाजात निराश न होता काम करण्याची व देशाचे चित्र बदलण्याची गरज आहे. दुर्बल माणसे शस्त्राचा आधार घेतात पण आपली नैतिक शक्ती मोठी हवी. एक माणूस उभा राहिला तर व्यवस्था बदलू शकतो.


तसेच लेशपाल जवळगे म्हणाले, हा माझ्यासाठी इतर अनेक सन्मानापेक्षा मोठा सन्मान आहे. आपण सर्वजन समाजाचे देणं लागतो व त्या प्रेरणेतून मी या कठीण प्रसंगात उभा राहू शकतो. श्री संजय नहार व सरहद संस्थेचा मी आभारी आहे.


कार्यक्रमाच्या प्रसंगी लेशपाल जवळगे, सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. संजय नहार, सरहद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हनुमंत रा. जाधवर, उपप्राचार्य डॉ. संगीता शिंदे , सरहद समन्वयक श्री. मयूर मसुरकर, विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मराठी विभागाच्या कु. साक्षी प्रभू (तृतीय वर्ष बी.ए.) या विद्यार्थिनीने केले तर आभार डॉ. संगीता शिंदे यांनी मानले.

See also  राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते पदवीदान समारंभात विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान