ऐश्वर्या कट्ट्यावर गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान;सामाजिक बांधिलकीचा आदर्श आणि कौतुकाची थाप

कात्रज : सामाजिक सलोखा आणि एकोपा जपण्यासाठी दक्षिण पुण्यातील ११ गणेश मंडळांनी गणेशोत्सवाची मिरवणूक एकत्रितपणे वाजतगाजत आणि भव्य स्वरुपात काढली. यातून त्यांनी केवळ धनकवडी, आंबेगाव परिसरातच नव्हे तर संपूर्ण पुणे शहरात एक चांगला संदेश दिला. या कार्याची दखल खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा घेतली. त्यांनी उचललेले हे आदर्श पाऊल लक्षात घेता त्यांच्या पाठीवर आपणही कौतुकाची थाप द्यावी असे ऐश्वर्य कट्ट्याने ठरवत. या ११गणेशमंडळांच्या पदाधिकाऱ्यांना ऐश्वर्या कट्ट्यावर निमंत्रित करण्यात आले होते.

त्यामध्ये श्री. शिवछत्रपती मित्र मंडळाचे अनिकेत तावरे, आदर्श मित्र मंडळाचे उदय निंबाळकर, फाईव्ह स्टार मित्र मंडळाचे विजय क्षीरसागर, केशव मित्रमंडळाचे शिरीष देशपांडे, जय महाराष्ट्र मित्र मंडळाचे नंदुकाका रेणुसे, नरवीर तानाजी मित्र मंडळाचे सुनिल पिसाळ, रामकृष्ण मित्र मंडळाचे समीर दिघे, उदय गुंड, विद्यानगरी मित्र मंडळाचे प्रतिक कुंभार, मोहननगर मित्र मंडळाचे अनिरुद्ध येवले, गुरूनाथ साळुंखे आणि मंडळांचे अनेक कार्यकते आवर्जून उपस्थित होते.

या निमित्ताने राष्ट्रपती पुरस्कार विजेते बाबासाहेब चोरघे यांचाही सन्मान करण्यात आला.गणरायाची आरती करून बाप्पाच्या जयघोषात कट्ट्याला सुरुवात झाली.

सर्व कार्यकर्त्यांचे औक्षण करून सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मोत्याची माळ, शाल, शिंदेशाही पगडी आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. या वेळी सर्व गणेशमंडळांनी या वर्षीचा त्यांचा देखावा आणि वर्षभरात त्यांनी नियोजन केलेले सामाजिक उपक्रम यांची सविस्तर माहिती दिली.

लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असणारा चांगला समाज घडावा या दिशेने आम्ही सुरुवात केलेली आहे. दरवर्षी एकेका मंडळाची स्वतंत्र मिरवणूक निघत असे परंतु यंदा ११ मंडळांनी एकत्र येत एकदिलाने मिरवणूक काढल्याने एक भव्य दिव्य आणि आदर्श मिरवणूक निघाली. ‘आपला बाप्पा’ ही भावना समस्त नागरिकांमध्ये रुजायला त्यामुळे मदत झाली. समाजामध्येही एकोप्याचा एक चांगला संदेश दिला गेला, अशी भावना या वेळी गणेश मंडळांच्याकार्यकर्त्यांनी व्यक्त केली. अधिकाधिक मंडळांना यात जोडण्याचा आणि सामाजिक सद्भाव निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

ऐश्वर्य कट्ट्याने सगळ्यांच्या पाठीवर ही कौतुकाची थाप दिल्याने आमचा उत्साह आणि उमेद आणखी वाढल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
गणेश मंडळ कार्यकर्त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी विलासराव भणगे, रवींद्र संचेती, युवराज रेणुसे, नेमीचंद सोळंकी, अ‍ॅड. दिलीप जगताप, सचिन डिंबळे, पराग पोतदार, विराज रेणुसे, शंकरराव कडू, आकाश वाडघरे,अभिराज रेणुसे, मयुर संचेती, मधुकर कोंढरे, मंगेश साळुंखे, सुनील सोनवणे, शिरीष चव्हाण, मनोज तोडकर व आप्पा रेणुसे मित्रपरिवार उपस्थित होता.

See also  पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून हिंजवडी गावातील सुविधांचा आढावा