अखिल न्यू बाणेर मित्र मंडळ व्यापारी संघटना यांच्यावतीने दहीहंडी उत्सव साजरा

बाणेर : अखिल न्यू बाणेर मित्र मंडळ व्यापारी संघटना, आयोजित दहीहंडी उत्सव वर्ष 11 यावर्षीचा दहीहंडी फोडण्याचा मान ईश्वर नगरचा राजा गोविंदा पथक, नवी मुंबई यांनी पटकावला पाच थर लावून दहीहंडी फोडण्यात आली.

दहीहंडी निमित्त कोथरूड मतदार संघाचे लोकप्रिय माजी आमदार मेधाताई कुलकर्णी यांनी सर्व गोपाळ भक्तांना शुभेच्छा दिल्या. दहीहंडी फोडल्यानंतर चतुर्शिंगी पोलीस स्टेशनचे सीनियर पी आय बालाजी पांढरे, क्राईम पी आय जानकर साहेब व माजी एसीपी भानुप्रताप बर्गे साहेब यांनी मंडळाला सन्मानित केले.


कार्यक्रमाच्या निमित्ताने बाणेर बालेवाडी महाळुंगे ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. मंडळाचे कार्यकारणी प्रकाश तापकीर, मंदार पोरे, विनायक चिव्हे, अक्षय तापकीर, पंकज तापकीर, वैभव तापकीर आदी उपस्थित होते.

See also  स्वातंत्र्यदिनी इंदू साकारणार 'भारतमाता'